Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

आमची साऊ डॉक्टर झाली म्हणून....

प्रिय डॉ. साऊ, आज ही पदवी तुझ्या नावासमोर बघताना ऊर अभिमानाने भरून आलाय.  कागदोपत्री तू जरी आज डॉक्टर झाली असलीस तरी आमच्यासाठी तू खूप वर्षांपासून डॉक्टरच आहेस.  मी तुला केव्हापासून डॉक्टर साऊ म्हणतोय मला आठवत नाही.  तेव्हा ते अनऑफिशिअल होतं.  यापुढे मीच नाही तर अख्खी दुनिया तुला डॉक्टर सायली या नावाने ओळखेल आणि तेसुद्धा ऑफीशिअली.  आज आपल्या पूर्ण घराचं इतक्या वर्षांपासून असलेलं एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचं मी सगळ्यांच्या डोळ्यात पाहिलं.  अगदी स्वतःच्या सुद्धा! आज जेव्हा संध्याकाळी मिटिंगला असताना अप्पांचा दादाला फोन आला तेव्हा ही गुड न्यूज ऐकून आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते.  मिटिंग अर्धवट सोडून आमचं लक्ष फोनवरच होतं.  समोर बसलेल्या क्लायंटना सुद्धा आम्ही अभिमानाने सांगितलं की आमची बहीण एम.बी.बी.एस झाली.  मिटिंग संपल्यावर थकलेलो असतानासुद्धा आमची पावलं घराकडे न वळता जुईनगरला वळली.  त्यात तुझ्याबद्दलच प्रेम होतं आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याबाबतीतला अभिमान होता. तुला आणि अप्पा काकीला कधी बघतोय अस झालं होतं.  कदाचित जुईनगरला पोहचेपर्यन्त आमची छाती दोन इंच अजून पुढे आली होती.

वाघ रस्त्यावर...

============================================= ==================================== हे शीर्षक वाचून मला वाघ दिसला असा तुमचा समज झाला असेल तर तसं नाही. नुकतंच अनिल अवचट यांचं "दिसले ते" पुस्तक वाचलं. त्यात याच शीर्षकाचा एक लेख होता. वाघ लोकांच्या वस्तीत फिरू लागले की लोकांनी जायचं कुठे? याउलट जर आपण त्यांच्या वस्तीवर आक्रमण करतोय तर त्यांनी जायचं कुठे? हा प्रश्न त्यांच्या अनुभवांसकट त्यांनी खूप मस्त शब्दात मांडला होता. तो लेख वाचताना काही माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या या लेखाद्वारे तुमच्यासमाेर मांडतोय. ============================================= ==================================== माझं लग्न झालं आणि त्यावर्षी गणपतीत आम्ही गावी गेलो होतो. श्रावणातलं कोकण म्हणजे स्वर्गाचं आपल्या मनी रेखाटलेल चित्र अगदी तसाच. सगळीकडे फक्त हिरवंगार वातावरण. वाहणारे ओढे आणि नद्या आणि त्यांचा होणार नादयुक्त एकलयी आवाज. सगळं वातावरण एकदम प्रसन्नच असत. आम्ही नवं जोडपं असल्याने पप्पा आम्हाला आमच्या बऱ्याच नातेवाईकांची गाव फिरवणार होते त्यामुळे मी मोठी सुट्टी टाकून गावाला ग