Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

युवोत्सव २०१८ आणि "जाणीव"

गेला दीडेक महिना फेसबुकवर युवोत्सव २०१८ ची जाहिरात चालू होती. गेली कित्येक वर्ष काही ना काही निमित्ताने आम्हाला सुतार समाजाचा कार्यक्रम अटेंड करता येत नव्हता. यावर्षी क्लासच्या वार्षिक स्नेहमेळाव्याला राकेश आवर्जून आला होता व निघताना त्यांनी तारीख आणि वेळ सांगून महिनाभर आधीच आमच्याकडून कमिटमेंट घेतली होती. सुशीलसुद्धा इव्हेंटमध्ये होताच त्याचा वेगळा फॉलोअप आणि त्यावर अजून संदेश फेसबुक मेसेंजरवर रिमाईंडर मेसेज टाकत होताच. "९० हुन अधिक कलाकार मिळून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आपल्या जवळचे आहेत त्यामुळे वेळ काढून जाऊच", असं दादा आणि मी ठरवलं होतं. तरीसुद्धा एक कन्फर्मेशन म्हणून काल सकाळी राकेशने पुन्हा आठवण करून देण्यासाठी फोन केलाच. संध्याकाळी काम लवकर आवरून दादा आणि मी एकत्र परेलला पोहचलो. दामोदर हॉलला आठचा कार्यक्रम होता आणि सव्वाआठ होऊन गेले होते. काउंटरला तिकीट्स असतील असं राकेशने मला व्हाट्सपवर सांगितलं होतं पण आमच्या नावाची तिकीट्स नव्हती. तिकीट्स विकत घेतली आणि जर आधीच घेतली असतील तर ती फुकट जातील म्हणून दादा आणि मी कन्फ्युजन मध्ये होत

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी

बाबा मला कळलेच नाही....

"यावर्षी कोणतं गाणं गाणार आहेस?", रोशन आणि संदीपने नाटकाच्या रिहर्सल ब्रेकमध्ये विचारलं.  "ठरवतोय अजून", मी सांगितलं. तसं अजून काही कन्फर्म नव्हतंच. सप्टेंबर पासूनच सगळ्या ग्रुप आणि घरामध्ये आमच्या श्रीच्या वार्षिक स्नेहमेळाव्याची चाहूल लागायला सुरुवात होते.  सोहळा डिसेंम्बरमध्ये असतो पण त्याच्या रिहर्सल सुरू दोन महिने आधीच होतात.  घरात मी कोणतंही गाणं गुणगुणायला लागलो की आई लगेच म्हणायची, "यावर्षी हे गाणं घेणार आहेस?  एवढा जास्त वेळेचा कार्यक्रम करता मग निदान अर्धा तास तरी तू गायला पाहिजेस स्टेजवर." "माझी आई आहेस म्हणून तू सहन करशील अर्धा तास.  बाकीचे लोक उठून जातील त्याच काय?", मी गमतीने म्हणायचो. सहज डोक्यात विचार आला की आईसाठी डेडिकेटेड गाणं घ्यायचं पण कोणतं ते नक्की नव्हतं. मध्ये अजाने कारवान नावाच्या एका प्रोड्क्ट प्रमोशनल व्हिडीओ व्हाट्सएपवर पाठवला.  त्या व्हिडीओमधली नायिका सतत "लग जा गले" हे गाणं गुणगुणत असते अस दाखवलं होत.  यापूर्वी इतक्या सिरियसली ते गाणं मी कधी ऐकलं नव्हतं.  गाण्याच्या लिरिक्समधून जवळच्या व्यक्तीकड

.....आणि पासपोर्ट हरवला

"सुब्या, माझी वेस्ट बॅग बस मध्ये राहिली", अजाने डोक्यावर हात मारून मला सांगितलं.  तो टॅक्सीत जाऊन पुढच्या सीटवर बसला होता.  मी आणि संदीप मागे बसत होतो.  त्याने सवयीप्रमाणे कमरेवरची बॅग पुढे करण्यासाठी हात मागे टाकला आणि त्याला समजलं की बॅग नाही.  तो तसा झटकन उतरला.  बस बऱ्यापैकी पुढे निघून गेली होती.  धावत जाऊन पकडणं तर शक्यच नव्हतं.  फक्त पैसे गेले असते तर ठीक होत पण सोबत आम्हा तिघांचे पासपोर्ट त्यात होते त्यामुळे आम्हा तिघांनाही धडकी भरली.  टॅक्सी ड्रायव्हरला आम्ही बसचा पाठलाग करायला सांगितलं.  त्याने तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये "पैसे आहेत का?" विचारलं.  आमच्याकडे इंडियन करन्सी आहे असं त्याला सांगितलं.  या संवादात एवढा वेळ गेला की बस पुढे निघून गेली होती.  बसचा पाठलाग करून फायदा नव्हता.  आम्ही कुआला लमपूर च्या हॉटेल मध्ये चेकइन करायचं ठरवलं व टॅक्सी त्या दिशेने नेली. मलेशियामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टपण प्रायव्हेट कंपनीकडे असतो.   तिथे पोहचेपर्यन्त अजाने त्या ट्रॅव्हल कंपनीला फोन करून बसची माहिती घेतली.  आमचा स्टॉप लास्ट असल्याने ती बस आता त्यांच्या टर्मिनलम

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा. प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच. "पप्पा, चेंबूरच्या पुढे को

संदेश दादास पत्र

संदेश दादा, ज्याच्या नावातच मेसेज आहे असा तू.  मला आठवत मी नववीला असेन तेव्हा तुझी आणि माझी भेट झाली.  लिखाणाची सवय मला त्यावेळी तुझ्यामुळे लागली (मध्ये खूप मोठा गॅप झाला पण गेल्या एक दोन वर्षांपासून पुन्हा सुरुवात केलीच).  तुझे आर्टिकल्स त्यावेळी वाचायचो आणि त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो.  ते जेव्हा तुला वाचायला दिलं त्यावेळी "स्वतःच अस काहीतरी लिही" असं समजावणार पत्र तू मला लिहिलंस.  पण त्यावेळी शाळेच्या पुस्तकाबाहेर वाचनच नव्हतं तर काय लिहिणार?  थोडे प्रयत्न केले पण नंतर बंद झालं.  आता जेव्हा ब्लॉग लिहायला लागलो तेव्हा अगोदर मेसेज तुला पाठवायचो.  तुझा रिप्लाय पण अगदी सविस्तर आणि थेट शब्दात असायचा.  तुझ्याकडे पूर्वीपासून मी समीक्षक म्हणूनच बघायचो आणि ती भूमिका तू व्यवस्थित पार पाडतोस.  माझं पुस्तक यावं अशी तुझी इच्छा आहे.  आता लिखाणाची आवड पुन्हा लागलीय तर नक्कीच येईल.  याची बीज तूच तर पेरलीस माझ्या कुमारभारती वयात ☺ मला नाटकाची सवय पण तूच लावलीस.  पाहिलं तिकीट काढून आणलेलंस "तू तू मी मी" चं.  त्यानंतर मी स्वतः जाऊन नाटकं बघायला लागलो.  मला "