Skip to main content

Posts

Showing posts from October, 2016

गिफ्ट

*गिफ्ट* - सुबोध अनंत मेस्त्री ====================================== माझा मुलगा सार्थक साडे पाच वर्षांचा आहे.  या वयात मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, आईस्क्रीम अशा गोष्टी आवडतात.  सध्या किंडर जॉयची क्रेझ मुलांना आहे.  त्यातलं चॉकलेट खाण्यापेक्षा खेळणी कोणती मिळतात यात त्यांना इंटरेस्ट जास्त असतो.   सार्थक सुद्धा किंडर जॉय पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी खाल्ल्यापासून दुसऱ्या चॉकलेट बद्दल बोलतच नाही.  आता एखाद्या चॉकलेटच्या तुलनेत ही किंमत कमीत कमी दुप्पट आहे.  त्याला पैशाची किंमत आतापासून कळावी म्हणून काहीतरी करावं अशी ईच्छा होती.  तेवढ्यात माझा फायनॅनशीअल ऍडवायजर मित्र महेश चव्हाण याची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली.  त्याचा मुलगा स्पर्श सार्थकपेक्षा एक दोन वर्षे लहान आहे.  स्पर्शने त्याच्या गल्ल्यातल्या सेविंग मधून स्वतःसाठी सायकल घेतली अशी ती पोस्ट होती.  मला कल्पना सुचली.  सार्थकची जुनी वॉटरबॅग आम्ही गल्ला म्हणून वापरायला लागलो.  काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे समीकरण.  मग ते अंथरून घालणं असू दे किंवा कचरा काढणं असू दे.  त्याची दिवसाला 2 रुपये कमाई  व्हायला लागली.  त्यात आमच्या आईने

डिसिजन

-सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== ======= आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यात आपण पूर्णपणे हतबल होतो.  त्यावेळी ती परिस्थिती देवावर किंवा नशिबावर सोडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही.  असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला.  हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या घरातला नसेल तरी मनावर ठसा उमटवून जाणारा होता.  ज्या व्यक्तींनी हॉस्पिटल आणि विशेषतः आय. सी. यु. जवळून पहिला असेल त्यांना हा प्रसंग नक्कीच स्पर्शून जाईल ==================================================== ======= "सुबू, अरे मनीषाला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आठ दिवसापूर्वी. आता आय सी यु मध्ये आहे. डॉक्टरने फक्त 24 तासाची मुदत दिली आहे. तू आणि विनू जाऊन भेटून ये एकदा.", पप्पा मला सांगत होते आणि मी एकदम स्तब्ध होऊन ऐकत होतो. मनीषा म्हणजे माझी मावशी. काकीची सख्खी बहीण. जेमतेम 35-40 वर्षांची. या वयात हे अस कस होऊ शकत हाच प्रश्न माझ्या डोक्यात सतत फिरत होता. तिच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तसे आम्ही फार काळ एकत्र नव्हतो पण जितका वेळ

दादास पत्र

दादास पत्र - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ==================================================== प्रिय दादू, वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्की कसा असावा याच जिवंत उदाहरण