Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

लॉलिपॉप

"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता. मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अग

सॉरी

एकदा गौरी रडतच दादाजवळ आली. "दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तिचा रडवेला चेहरा बघून दादाने विषयाच गांभीर्य ओळखलं. "बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसू. तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही", अस म्हणून दादा तिला बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेला. दादाने तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तो समोरच्या बाकावर बसला. "बोल काय झाल?" गौरी मान खाली घालूनच बसली होती. दादाने विचारल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देऊन ती रडायला लागली. दादाही तिला काही बोलला नाही. बऱ्याच वेळेला रडल्यानंतरच मन मोकळं होत. थोड्या वेळाने ती शांत झाली. दादाने तिला पाणी दिल. थोडी शांत झाल्यावर तिने सांगायला सुरवात केली. "दादा, काल माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे. माझ आणि पप्पाचं काल घरात जोरात भांडण झाल. एवढं कि चाळीतीले लोक जमा झाले. ते मला प्रत्येक गोष्टीत अडवत असतात. हे करू नको ते करू नको. मी लहान पणापासून सगळं सहन केलं पण आता ते नाही होत. काल जरा जास्तच जोरात वाजलं. मी पप्पाना अरे तुरे केलं इथपर्यंत प्रकरण गरम झालं होत. त्यांनीही मला शिवीगाळ केला आणि मीही वाटेल तसं बोलली