Skip to main content

Posts

Showing posts from 2016

नेटयुग

नेटयुग -    सुबोध अनंत मेस्त्री सध्या नेटयुग जोरदार सुरु आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग आपल्या हाताच्या बोटावर आलं आहे. “काय तू व्हाट्सअप/ फेसबुकवर नाहीस? कुठल्या जगात वावरतो राव!.” म्हणजे व्हाट्सअप किंवा फेसबुकवर नसणं म्हणजे जगाच्या कितीतरी मागे असल्याचा एक समज निर्माण झालाय. एखादा इव्हेंट किंवा पिकनिकच सोडाच पण आता लोक कोणत्या हॉटेल मध्ये जेवतायत, कोणतं गाणं ऐकतायत कोणता पिक्चर बघतायत हे सुद्धा पोस्ट करतात. या आभासी जगात व्यक्ती विशेषतः मुलं हरवत चालली आहेत. आता इंटरनेटसुद्धा दिवसेंदिवस स्वस्त होत जाईल. बऱ्याच ठिकाणी डिजिटल इंडियाच्या उपक्रमाखाली वायफाय कनेक्शन लावले जातील आणि या आभासी जगाच्या कक्षा आणखी रूंदावतील. सकाळी झोपतुन उठल्या उठल्या लगेच आपण पहिले व्हाट्सअप चे मेसेजेस चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात होते. त्यानंतरही काम करत असताना काही मिनिटांनी आपलं लक्ष या मोबाईल कडे जातंच आणि आपण आपल्या कामापासून वेगळे होतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर झाला तर त्यासारखं प्रभावी माध्यम कोणतंच नाही. पण याचा गैरवापर होत असेल तर त्यासारखं घातकही काही नाही. तंत

गिफ्ट

*गिफ्ट* - सुबोध अनंत मेस्त्री ====================================== माझा मुलगा सार्थक साडे पाच वर्षांचा आहे.  या वयात मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, आईस्क्रीम अशा गोष्टी आवडतात.  सध्या किंडर जॉयची क्रेझ मुलांना आहे.  त्यातलं चॉकलेट खाण्यापेक्षा खेळणी कोणती मिळतात यात त्यांना इंटरेस्ट जास्त असतो.   सार्थक सुद्धा किंडर जॉय पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी खाल्ल्यापासून दुसऱ्या चॉकलेट बद्दल बोलतच नाही.  आता एखाद्या चॉकलेटच्या तुलनेत ही किंमत कमीत कमी दुप्पट आहे.  त्याला पैशाची किंमत आतापासून कळावी म्हणून काहीतरी करावं अशी ईच्छा होती.  तेवढ्यात माझा फायनॅनशीअल ऍडवायजर मित्र महेश चव्हाण याची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली.  त्याचा मुलगा स्पर्श सार्थकपेक्षा एक दोन वर्षे लहान आहे.  स्पर्शने त्याच्या गल्ल्यातल्या सेविंग मधून स्वतःसाठी सायकल घेतली अशी ती पोस्ट होती.  मला कल्पना सुचली.  सार्थकची जुनी वॉटरबॅग आम्ही गल्ला म्हणून वापरायला लागलो.  काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे समीकरण.  मग ते अंथरून घालणं असू दे किंवा कचरा काढणं असू दे.  त्याची दिवसाला 2 रुपये कमाई  व्हायला लागली.  त्यात आमच्या आईने

डिसिजन

-सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== ======= आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यात आपण पूर्णपणे हतबल होतो.  त्यावेळी ती परिस्थिती देवावर किंवा नशिबावर सोडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही.  असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला.  हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या घरातला नसेल तरी मनावर ठसा उमटवून जाणारा होता.  ज्या व्यक्तींनी हॉस्पिटल आणि विशेषतः आय. सी. यु. जवळून पहिला असेल त्यांना हा प्रसंग नक्कीच स्पर्शून जाईल ==================================================== ======= "सुबू, अरे मनीषाला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आठ दिवसापूर्वी. आता आय सी यु मध्ये आहे. डॉक्टरने फक्त 24 तासाची मुदत दिली आहे. तू आणि विनू जाऊन भेटून ये एकदा.", पप्पा मला सांगत होते आणि मी एकदम स्तब्ध होऊन ऐकत होतो. मनीषा म्हणजे माझी मावशी. काकीची सख्खी बहीण. जेमतेम 35-40 वर्षांची. या वयात हे अस कस होऊ शकत हाच प्रश्न माझ्या डोक्यात सतत फिरत होता. तिच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तसे आम्ही फार काळ एकत्र नव्हतो पण जितका वेळ

दादास पत्र

दादास पत्र - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ==================================================== प्रिय दादू, वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्की कसा असावा याच जिवंत उदाहरण

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष
ही दोस्ती तुटायची नाय !!! - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== आज माझ्या मित्राचा वाढदिवस. हे पत्र खर तर मी त्याला पर्सनली पाठवायला हव होत पण मैत्री काय असते याच जीवंत उदाहरण हा माझा मित्र अजय आहे. या माझ्या पत्रातून मैत्री म्हणून एखाद्याच्या आयुष्यात आपला सहभाग कसा असावा व अजय व्यक्ति म्हणून कसा आहे हे जगापर्यंत पोहचाव म्हणून मी फेसबुक ल पोस्ट करत आहे. या पत्रातून अजय मुळे मी पुढे कसा येत गेलो हे मांडण्याचा हा प्रयत्न. ==================================================== प्रिय अजा, खर तर पत्र वैगेरे ही निव्वळ फॉर्मलिटी आहे आणि आपल्यात ती कधीच नसते. पण माणूस जगात नसेल तेव्हा त्याच लिखाण मागे राहत आणि भावना तोंडापेक्षा लिखाणातून चांगल्या बाहेर येतात म्हणूनच आज हे पत्र लिहितोय आणि असही आपण तोंडावर बोलताना शिव्यांशिवाय बोलत नाही. स्तुती तर खूपच लांब राहिली. आज थोडसं फॉर्मल बोलेन कारण आज इथे हे गरजेचं आहे. आयुष्यातल्या काही आठवणींची उजळणी करताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून तरळून जातं. काही माणसं आयुष्यात येऊन निघून जातात. त्यांचा रोल आ

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

रफ अँड टफ

आज ट्रेन मधून बेलापूरपासून चेंबूर पर्यंत प्रवास करत होतो. दर गुरुवारी मंदिरात जाण्याची सवय खूप पूर्वीपासूनच आहे आणि तेही चेंबूरचच साईबाबा मंदिर. तसा मी नेहमी संध्याकाळीच जातो पण रक्षाबंधन असल्याने संध्याकाळी जायला जमणार नाही म्हणून दुपारीच निघालो. दुपारची वेळ आणि त्यात काही लोकांची सुट्टी त्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. पण काही लग्न झालेल्या आणि काही कुमारी अशा बहिणी नटून आपल्या भावाकडे निघाल्या होत्या आणि त्यांचं कुटुंब सोबत असल्याने काय ती थोडी फार रोजपेक्षा जास्त गर्दी. दरवाज्याच्या बाजूला सीटला समांतर असणाऱ्या जाळीच्या बोर्डला टेकून मी उभा राहिलो होतो आणि आठ दहा माणसे त्या पॅसेज मध्ये उभी होती. सीवुड स्टेशन ला ट्रेन थांबली आणि एक 12-13 वर्षाची मुलगी व तिच्याबरोबर दीड दोन वर्षाची लहान मुलगी ट्रेनमध्ये चढले. मोठी मुलगी काटकुळी...सावळी... केस सोडलेले आणि विस्कटलेले...चेहरा पूर्ण मळकटलेला...मळकट पंजाबी जांभळ्या रंगाचा ड्रेस तोही काळ्या रंगाच्या जवळपास गेलेला. एकंदरीत तिचा अवतार बघून एखाद्याला दया यावी, त्यापेक्षा ही अधिक कीळसच यावी आणि तिने आपल्याला हात लावून आपले