Posts

आठवणीतला गारवा

Image
आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री
आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्यामागे थोडा लांब …

शिवी

Image
*शिवी*
- सुबोध अनंत मेस्त्री
========================================================================
"सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती.

"काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत.

"अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती.

"बरं मग", मी विचारलं.

"बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती.

"त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी नाही देणार का?", मी विच…

४९ रुपयांचं कर्ज

Image
*४९ रुपयांचं कर्ज*
- सुबोध अनंत मेस्त्री

========================================================================
शाळा सोडून आता 16 वर्ष झाली. शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगल्या सवयी आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक होत्या चौधरी बाई. माझ्या आईनंतर ज्यांनी मला आईसारखी माया लावली असेल त्या चौधरी बाई होत्या. अजूनही बाईंना भेटलो आणि वाकून नमस्कार केला की "खूप मोठा हो", असा आशीर्वाद मिळतो आणि काहीतरी करण्याची जिद्द. उद्या चौधरी बाई शाळेतून रिटायर्ड होत आहेत. त्यांच्या एका आठवणीचा हा लेख.
========================================================================

सातवीची नऊमाई परीक्षा होऊन गेली होती. गणिताची भीती मला असायचीच आणि त्यात नापासही झालो होतो. मला त्यावेळी क्लास लावण्याची भारी क्रेझ होती पण घरची परिस्थिती पप्पांच्या बेताच्या कामामुळे तशी चांगली नव्हती.

"दादा अण्णा झाले पास क्लास न लावता. तुला कशाला पाहिजे क्लास. तू हुशार आहेस", अस बोलून आई नेहमीच माझी क्रेझ उतरवायची. मला आता वार्षिकच टेन्शन होत. पुढच्यावर्षी याच वर्गात राहावं लागतंय की काय …

बी. डी. डी. चाळ

Image
*बी. डी. डी. चाळ*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

संजय दादा आणि अरुण सरांशी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये  मिटिंग संपवून दादा आणि मी टॅक्सी मिळेल या हिशोबात शिवाजी पार्क समोरच्या शिवसेनाभवनाच्या रस्त्याला लागलो.  एक दोन टॅक्सीवाल्याना विचारलं पण नेहमीप्रमाणे नकारच मिळाला.  पलीकडच्या रस्त्यावरून एक टॅक्सी शिवाजी पार्ककडे चालली होती त्यांनी आम्हाला हातवाऱ्यानेच कुठे अस विचारलं.  मी लांबूनच "वडाळा  स्टेशन" अस मोठ्याने ओरडून सांगितलं.

"थांबा, वळवून आणतो", त्याने हात फिरवून सांगितलं.

"काका थोडे सिरीयस दिसतात या धंद्यामध्ये", मी मस्करीत दादाला म्हटलं.  टॅक्सी फिरून आमच्याकडे आली.

"बसा", त्यांनी मागचा दरवाजा उघडला.  आम्ही बसलो.

"मघाशी एवढं आभाळ आलं होत वाटलं पाऊस येईल.  आलाच नाही.   ढग आले तसे गायब झाले", गाडी सुरू झाल्या झाल्याच टॅक्सी ड्रायव्हर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

"पनवेलला पडला पाऊस दीड तास तरी.", दादाने सांगितलं.

"अरे वा तिकडे पडला का?  मग येईल इकडे पण हळू हळू…

वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज

Image
*वि प्रेफर स्मार्ट लँग्वेज*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

"एक्स्क्यूज मी....आर यु गाईस लोकल हिअर?",  एक तिशी पस्तीशीतल्या तरुणाने आमच्या जवळ येऊन विचारलं.  सामान्य मध्यमवर्गीय घरातला, गोल चेहरा, सावळा वर्ण, इन शर्ट आणि हातात नायलॉनची झिप असलेली बॅग.  त्याच्या बोटाला धरून एक 5-6 वर्षाची फ्रॉक घातलेली मुलगी खेळत होती.  बेळगाववरून परतताना नरसोबाची वाडी करून संजय दादांनी आम्हाला कोल्हापुरात सोडलं होत.  रिजर्वेशन केलेल्या बसला यायला अजून 3-4 तास होते.  तेवढ्या वेळात महालक्ष्मी मंदिर, त्याच्या बाजूचा शाहू महाराजांचा राजवाडा आणि नंतर जेवण असा प्लॅन आम्ही केला होता.  मंदिरात लाईन पाहून मी आणि दादाने मुखदर्शन घेण्याचं ठरवलं.  राजेश भाई लाईन मध्ये उभे होते आणि आम्ही त्यांची वाट पाहत मंदिराच्या आवारात गप्पा मारत उभे असताना या तरुणाने आम्हाला गाठलं होत.

"नो, वि आर नॉट.  वी आर फ्रॉम न्यू बॉम्बे",  मी त्याच्याकडे पाहून उत्तर दिल.

"व्हीच लँग्वेज डु यु प्रेफर....आय मिन हिंदी, मराठी, इंग्लिश?", त्याने विचारले.

"वि आ…

बोल दो ना जरा

Image
*बोल दो ना जरा*
- सुबोध अनंत मेस्त्री

=========================================================================

"पप्पा, माझ्या खडशिंगड (मूळ नाव खरशिंगर पण ते सार्थकला अजून व्यवस्थित उच्चारता येत नाही) टीचर खूप मस्त शिकवतात. मारत पण नाही आम्हाला. मला भरपूर आवडतात या टीचर", एकदा सहज मी सार्थकला त्याच्या क्लास टीचरबद्दल विचारलं होत तेव्हा त्याच्याकडून हे उत्तर मिळालं होतं.

"आपण तुझ्या शेवटच्या पेपरच्या दिवशी बाईंना पत्र लिहू. त्यात तुला जे वाटत टीचरबद्दल ते लिही. टीचरना आवडेल सांगितलंस तर", मी त्याला सुचवलं. त्याने सुद्धा "चालेल" म्हणून होकार दिला.

सार्थकच पहिलीच वर्ष असल्याने त्याला पहिल्या दिवशी मी शाळेत घेऊन गेलो होतो व नेमकी फी रिसीट न्यायला विसरलो. त्या दिवशी बाईंची आणि माझी पहिली भेट झाली. 60 च्या घरात बाईचं वय असेल. डोळ्यावर चष्मा आणि अत्यंत साधं राहणीमान. कुठेच आधुनिकतेची जोड नाही. त्यांनी मला रिसीट शिवाय सार्थकला शाळेत बसविण्यास स्पष्ट नकार दिला. मी उद्या रिसीट पाठवतो सांगून पण त्या काही ऐकेनात.

"अहो अस कुणीही येऊन बसेल वर्गात. उद्या त…

ए दिल है मुश्किल

Image
*ए दिल है मुश्किल*
- सुबोध अनंत मेस्त्री

=========================================================================

तारुण्याच्या बेभानपणात काही अशा काही चूका घडतात की ज्याचा परिणाम आयुष्यावर बेतू शकतो. अशीच घडलेली ही एक घटना. हे आर्टिकल ज्या मुलीवर लिहिलं गेलं आहे तिची परवानगी हे आर्टिकल पब्लिश करण्याआधी घेतलेली आहे.

=========================================================================

सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे व्हाट्सप उघडून पाहिलं. रेग्युलर ग्रुपच्या मेसेज बरोबर सोनलचा (नाव बदलले आहे) पर्सनल मेसेज डाउनलोड झाला. त्यात तिच्या लग्नाची पत्रिका आली होती. पत्रिका पाहून मी तिला "Congrats!!!" चा मेसेज टाकला त्यावर तिने "लग्नाला या" असा रिप्लाय दिला.

सोनलच आयुष्य रुटीनला लागतंय पाहून समाधान वाटलं. एखाद वर्षांपूर्वीची माझी आणि सोनलची ओळख. तशी खास ओळख नाही म्हणता येणार कारण आम्ही मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर सॉफ्टस्किल ट्रेनिंग देत असताना तिथे भेटलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी ती एक. आम्ही आमचे मोबाईल नंबर सगळ्या मुलांना शेअर केल…